कर्नाटक सरकारने मुंबई-कर्नाटक हे जुने नाव बदलून कित्तूर-कर्नाटक असे घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे कन्नडिगांनी जल्लोष केला.
मुंबई हे सीमाभाग अर्थात उत्तर कर्नाटकाला जोडलेले नाव रद्द करण्याचा अट्टाहास करून हा जल्लोष करण्यात येत आहे.
सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कित्तूर-कर्नाटक घोषणेची घोषणा सायंकाळी करण्यात आली.बेळगावच्या खासदार मंगला अंगडी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त के. त्यागराजन यांनीही या जल्लोष कार्यक्रमाला भेट दिली.
या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना मान्यवरांनी परिसरातील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी सरकारने पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतेच कित्तूर महोत्सवाचे उदघाटन केले.त्यावेळी कित्तुर कर्नाटक ची घोषणा करण्यात आली होती.विविध कन्नड संघटनांच्या नेत्यानीही कित्तूर चन्नम्मा सर्कलमध्ये आनंदोत्सव साजरा केला.