Friday, April 26, 2024

/

बेळगाव बाबत साहित्य संमेलनात दिखाऊ ठराव करणे बंद करा -अ‍ॅड. असीम सरोदे 

 belgaum

‘बेळगाव महाराष्ट्रात आणा’  असा दिखाऊ ठराव करण्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील वार्षिक दिखाऊ कार्यक्रम बंद करावा आणि बेळगावातील मराठी माणसांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी कृती कार्यक्रम जाहीर करावा. भाषिक विविधतेतील सुंदरता न जपता मराठी माणसांवर बेळगावात कर्नाटक राज्याच्या कन्नड धार्जिण्या सरकारकडून, पोलिसांकडून व राजकारण्यांकडून होणाऱ्या संघटित हिंसाचाराचा निषेध करणाऱ्या वेदना साहित्यिकांनी स्पष्ट शब्दात व्यक्त कराव्या असे परखड मत जेष्ठ कायदेतज्ञ व मानावीहक्क विश्लेषक अ‍ॅड असीम सरोदे यांनी मांडले.

बेळगाव येथील शाहिद भगतसिंग सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘बेळगावमध्ये होणारी मानवी हक्कांची पायमल्ली’ या विषयावर अ‍ॅड. सरोदे बोलत होते. आम्ही मराठी बेळगावकर संघ व साम्यवादी परिवार यांच्यातर्फे आयोजित या कार्यक्रमात डॉ आनंद मेंणसे, जेष्ठ वकील अ‍ॅड नागेश सातेरी, बेळगावचे माजी महापौर मालोजी अष्टेकर. मराठी जनतेसाठी कार्यरत युवा नेते पियुष हावळ इत्यादी उपस्थित होते.

संविधानातील  तरतुदीनुसार प्राथमिक शाळांपासून मातृभाषेत शिक्षण दिले पाहिजे हे आवश्यक आहे व त्यानुसार शिक्षणव्यवस्था आहे का?, ती नीट राबविली जाते का हे बघण्याची जबाबदारी असलेला विशेष अधिकारी नेमणे कलम 350 (ब) नुसार जरुरी असतांना तसे विशेषअधिकारी का नेमले नाहीत? असा सवाल अ‍ॅड असीम सरोदे यांनी उपस्थित केला. राज्य सरकार घटनाबाह्य वागत आहे असे त्यांनी सांगितले.

 belgaum

Ad aseem sarode
राज्यातील भाषिक अल्पसंख्याकांची आकडेवारी, भाषेमुळे आर्थिक-सामाजिक तुटलेपन आलेले आहे का, भाषिक वेगळेपणामुळे होणारे अन्याय अशी माहिती राज्यपातळीवर जमा करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. मराठी भाषिकांबद्दल मुद्दाम अपूर्ण, चुकीची आणि दिशाभूल माहिती गोळा करण्याचे षडयंत्र राजकारणाचा भाग आहे त्यामुळे बेळगाव मधील भाषिक अल्पसंख्याक जनता अन्यायग्रस्त होत चालली आहे असा आरोप अ‍ॅड असीम सरोदे यांनी केला.

सार्वजनिक व खाजगी जागी आपली संवादाची भाषा ठरविण्याचा व भाषेची निवड करण्याचे स्वातंत्र्य हा मानवी-नागरी हक्कांचा भाग आहे तरीही मराठी भाषा का वापरता म्हणून बेळगावातील मराठी भाषिकांना होणारी शारीरिक मारहाण आणि त्याकडे पोलिसांनी मुद्दाम दुर्लक्ष करणे हा ठरवून करण्यात येणारा अन्याय अधिक गंभीर आहे. कल्याणकारी राज्य म्हणून मराठी भाषिकांवर होणारे अत्याचार थांबविणे व सकारात्मक कृती असणारा वेगळा कायदा भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्करक्षणासाठी तयार करणे ही संविधानिक नीतिमत्ता कर्नाटक राज्यसरकारने दाखवावी अशी अपेक्षा अ‍ॅड असीम सरोदे यांनी व्यक्त केली.

भाषिक विविधता ही सुंदरता आहे. लोकसाहित्य, संस्कृती व भिन्न अस्तित्व भाषेमुळे अधोरेखित होते. भाषिक अल्पसंख्यत्व जगण्यातील अडचण ठरणे व राज्यसरकारने ठरवून मराठी बोलणाऱ्यांना अन्यायाच्या परिस्तिथीत ढकलणे म्हणजे मराठी भाषिकांचे नियोजपूर्वक करण्यात येणारे गुन्हेगारीकरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.