सिंदगी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार रमेश भुसनूर विजयी झाले आहेत. ते 31185 मतांच्या फरकाने विजयी झाले.
भाजपचे उमेदवार रमेश भुसनुर यांनी काँग्रेसचे अशोक यांच्यावर विजय मिळवला अशोक यांना ६२६८० तर रमेश भुसन यांना ९३,८६५ मते मिळाली. जेडीएस च्या नाझिया अंगडीला ४३५३ मते मिळाली.
गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या रमेश यांनी पोटनिवडणूक जिंकून सिंदगी परत घेतली आहे.
हनगल मतदारसंघात काँग्रेसचे श्रीनिवास माने विजयी झाले आहेत. त्यांनी निवडणूक प्रतिष्टेची बनविलेल्या भाजप उमेदवाराचा पराभव केला आहे.
श्रीनिवास माने यांना 73 हजार 640 मते पडली असून भाजपचे उमेदवार शिवराज सज्जनार यांना त्यांनी पराभूत केले. सज्जनार यांना 66865 इतकी मते पडली आहेत.
खरेतर दोन्ही जागा आम्हीच जिंकू असा दावा भाजपने केला होता, मात्र भाजपला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले असून बॅक फुटवर गेलेला काँग्रेस पक्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
यावेळी ही पोटनिवडणूक अतिशय प्रतिष्टेची मानली गेली होती. दोन्ही जागांवर यश मिळवण्यासाठी काँग्रेस,भाजप या दोन्ही पक्षांनी कंबर कसली होती. भाजपने स्वतः मुख्यमंत्री बसवराज बोंमाई यांना या निवडणुकीची जबाबदारी दिली होती तर काँग्रेस आणि जेडीएस चे सर्व बडे नेते या निवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघात तळ ठोकून होते.
संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या निवडणुकीचा निकाल आज लागला असून सर्व राजकीय गणिते बदलून गेली आहेत. कर्नाटकातील भाजप च्या आत्मविश्वासालाही या निवडणुकीने तडा दिला आहे.