सालाबादप्रमाणे दीपावलीनिमित्त शिवसेना सीमाभाग बेळगावतर्फे भव्य शिवकालीन किल्ला स्पर्धा -2021 चे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेनेतर्फे आयोजित केली जाणारी ही स्पर्धा शहरातील जुनी किल्ला स्पर्धा आहे. गेली 26 वर्षे आयोजित केली जाणारी ही स्पर्धा बेळगाव, शहापूर, वडगाव आणि अनगोळ अशा 4 विभागात घेतली जाते.
छ. शिवाजी महाराज धर्मवीर छ. संभाजी महाराज आणि जिजाऊ साहेब यांच्या प्रेरणेने या स्पर्धेत दरवर्षी सुमारे 130 ते 125 मंडळे भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करत असतात.
यंदा सदर स्पर्धेसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी किल्ला परीक्षणास सुरुवात केली आहे. तरी किल्ला स्पर्धकांनी लवकरात लवकर येत्या 4 दिवसात किल्ल्याची सजावट व रंगरंगोटी पूर्ण करावी.
किल्ला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा. गडाची माहिती बाजूला पत्रकावर अथवा फलकावर लिहावी. सदर भव्य किल्ला स्पर्धेची सर्व किल्ला स्पर्धकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी केले आहे.