राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी तसेच आयबीपीएस एसओ परीक्षा 2021ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन IBPS ने विविध राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एकूण 1828 पदांच्या भरतीसाठी जाहीरात काढली आहे. याअंतर्गत बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती होणार आहे. त्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव – आय.टी. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी आणि विपणन अधिकारी
पद संख्या – एकूण 1828 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधारक असावा.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वयोमर्यादा – 20 ते 30 वर्षे
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग : रु. 850/- राखीव प्रवर्ग : रु. 175/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
जाहिरात पहा – https://cutt.ly/TThlDjC