Thursday, December 19, 2024

/

शेतकरी जिल्हाधिकारी बैठक निष्फळ- शेतकरी आंदोलनावर ठाम

 belgaum

शेतकऱ्यांना आपल्या जमिनीपेक्षा कोणतीच गोष्ट महत्वाची वाटत नाही शेतकऱ्यांला कोंडीत पकडून त्यांची जमीन पैश्याच्या अमिषावर लाटण्याचा प्रयत्न करत आहे.जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ सांगत आहेत तुम्ही मोबदला घ्या आणि जमीन मोकळीक करा पण शेतकरी आपल्या जमिनीवर ठाम आहेत.

बैठकीत शेतकऱ्यांनी गुरुवारी पासुन सुरू केलेल्या कामाच्या वर्क ऑर्डरची मागणी केली असता ठेकेदारांनी दाखवलेल्या वर्क ऑर्डर बद्दल आणि झिरो पॉईंट वर शेतकरी समाधानी नव्हते.

अखेर जिल्हाधिकारी आणि शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरली पुन्हा शेतकऱ्यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले. बैठकीत शेतकऱ्यांच्या वतीनं वकील भरत जाधव यांनी कायदेशीर बाजू मांडली.

हालगा -मच्छे बायपास रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची सरकारला जाणीव आहे. त्यासाठीच सरकारने आतापर्यंत 925 पैकी 820 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज दिली.Farmers meet dc

हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सध्या तीव्र आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी शेतकरी नेत्यांच्या बैठकीप्रसंगी बोलताना जिल्हाधिकार्‍यांनी उपरोक्त माहिती दिली. आतापर्यंत शेतकऱ्यांना 26 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असून 4 कोटी रुपये बाकी आहेत.

आतापर्यंत 800 हून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी भु-संपादित करण्यासाठी दिल्या असून त्याची नुकसान भरपाई घेतली आहे, असेही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्पष्ट केले. तसेच हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामासाठी सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीस वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी आत्मदहणाचा प्रयत्न करणाऱ्या आकाश अनगोळकर या भाजून जखमी झालेल्या शेतकऱ्यांची इस्पितळात जाऊन विचारपूस केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.