पर्यावरण दिवस आपण वर्षातील एक दिवस साजरा करतो. पर्यावरण दिनाचे कार्यक्रम होतात, काही उपाययोजनाही केल्या जातात. परंतु आपण वर्षाचे बारा महिने पर्यावरणाचा विचार केला तर येणारा काळ आपल्या पुढच्या पिढीसाठी हा उत्तम असेल.
आपल्या रोजच्या जीवनात आपण सर्रास प्लास्टिकचा वापर करत असतो. स्वयंपाकघरापासून ते अगदी दिवाणखाण्यापर्यंत प्लास्टिकच्या असंख्य वस्तू आपल्याकडे असतात. हे सर्वव्यापी पर्यावरण विरोधी घटक आपल्या जीवनावर अधिराज्य गाजवित आहेत. प्लास्टिकचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही. या वस्तुस्थितीची जाणीव असूनही आपल्या सुसंस्कृत समाजात प्लास्टिकचा अखंड वापर थांबत नाही. नॅशनल जिओग्राफिकच्या मते पृथ्वीचा पृष्ठभाग सुमारे 8.3 अब्ज मेट्रिक टन प्लास्टिकने व्यापलेला आहे.
प्लास्टिकसाठी पर्याय शोधणे आणि आपले दैनंदिन जीवन निरोगी आणि पर्यावरणास अनुकूल बनविणे खरोखर सोपे आहे. आपणही ते करू शकता हे साधे सोपे मार्ग अवलंबून.
1. किचनमध्ये जिथे शक्य तिथे प्लास्टिकचा वापर टाळा.
2. आपल्याकडची सर्वात मोठी समस्या म्हणजे सॅनिटरी नॅपकिन.
3. बाहेर जाताना हातात प्लास्टिक पिशवीऐवजी कापडाची पिशवी घ्यायची सवय लावा.
एखादी गोष्ट करण्यासाठी काहीतरी मोठ्या कृतीची गरज नसते. तर छोट्या गोष्टींचा अवलंब करूनही आपण पर्यावरणाची निगा राखु शकतो.