Thursday, December 19, 2024

/

नगरपालिकेत बालमजुरी? : दणाणले अधिकार्‍यांचे धाबे

 belgaum

सरकार एकीकडे बालमजुरीच्या विरोधात कठोर पावले उचलत असताना दुसरीकडे मुगळखोड नगरपालिकेमध्ये लहान मुलांकडून काम करून घेतली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केल्यामुळे अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील मुगळखोड (ता. रायबाग) येथील नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर लहान मुलांकडून कचऱ्याच्या पोत्यांची उचल व इतर कामे करून घेतली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

त्याचप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही संतप्त नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी पुराव्यासह केलेल्या बालमजुरीच्या आरोपामुळे मुगळखोड नगरपालिकेच्या अधिकारीवर्गाचे सध्या धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.