मोटरसायकलवरून बेळगाव ते नेपाळ असा सिक्कीम मार्गे दीर्घ पल्ल्याचा प्रवास एकाकी यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचा पराक्रम राजवीर रायबाग या बेळगावच्या 19 वर्षीय युवकाने केला असून आज शहरात त्याचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. या पद्धतीने सोलो अर्थात एकट्याने नेपाळपर्यंत जाऊन येणारा राजवीर हा दक्षिण भारतातील पहिला मोटरसायकलस्वार आहे.
बेळगावच्या राजवीर रायबागी याने आपल्या मोटरसायकलवरून एकट्याने 33 दिवसात बेळगाव ते नेपाळ आणि पुन्हा बेळगाव असा दीर्घ अंतराचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. नेपाळ प्रवासाच्या आपल्या 33 व्या दिवशी आज गुरुवारी बेळगावात दाखल झालेल्या राजवीर याचे हितचिंतक आणि नातलगांनी पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी उपस्थितांमध्ये राजवीर रायबागी याच्या धाडसी प्रवास मोहिमेबद्दल कौतुक आणि प्रशंसोद्गार काढले जात होते.
आपल्या मोहिमेबद्दल बेळगाव लाइव्हशी बोलताना राजवीर रायबागी याने बेळगाव ते नेपाळ आणि पुन्हा बेळगाव अशी सोलो अर्थात एकट्याने मोटरसायकल प्रवासाची मोहीम मी आज यशस्वी केली आहे. या पद्धतीने नेपाळपर्यंत जाऊन येणारा दक्षिण भारतातील मी पहिलाच मोटरसायकलस्वार आहे, असे सांगितले.
माझा हा प्रवास अत्यंत खडतर आणि जोखमीचा होता. परंतु प्रचंड आत्मविश्वासाने तो मी यशस्वीरीत्या पूर्ण केला. प्रवासाला सुरुवात केल्यानंतर आज 33 व्या दिवशी मी बेळगावला परत आलो आहे.
प्रवास अत्यंत चांगला झाला. कोणत्याही गंभीर समस्येचा सामना करावा लागला नाही आणि गाडीने देखील चांगली साथ दिली असे सांगून ‘कोणत्याही वयात आपल्याला कांहीही साध्य करता येते’ हा संदेश युवा पिढीपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने मी ही मोटरसायकल प्रवासाची मोहीम राबविली, अशी माहित राजवीर रायबागी याने दिली.
https://www.instagram.com/p/CWtC2SghoWT/?utm_medium=copy_link