Wednesday, January 15, 2025

/

जिल्हा प्रशासन झाले सतर्क : 3 वाॅर्ड सज्ज!

 belgaum

‘ओमिक्राॅन’ या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरीएंटमुळे संपूर्ण राज्यसह बेळगाव जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 55 बेड्सची सोय असलेले तीन कोरोना वाॅर्ड सज्ज ठेवले आहेत.

बेंगलोर, धारवाड आणि हासन जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तसेच शेजारील महाराष्ट्र आणि केरळ मधूनही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांना खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.

त्यानुसार परराज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना आरटी -पीसीआर किंवा कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले असतील तरच प्रवेश दिला जात आहे. सीमावर्ती भागातील चेकपोस्टवर पुन्हा एकदा पोलीस आणि आरोग्य खात्याचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.District hospital

नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. जिल्ह्यात सध्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी त्यातील धोका लक्षात घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमधील आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. हॉस्पिटलमध्ये 55 बेडची व्यवस्था असलेले 3 वाॅर्ड कोरोना रुग्णांसाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच आवःश्यक औषध साठ्याचीही जुळवाजुळव केली जात आहे.

दरम्यान, कोरोनाच्या नवीन विषाणूच्या संसर्गाबाबत खबरदारी म्हणून चांचण्या दुप्पटीने वाढविण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. दररोज सरासरी सुमारे 2,000 जणांचा चांचण्या सुरू होत्या. मात्र आता हे उद्दिष्ट 4,000 असे निश्चित करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाबाबत आढावा घेतला असून त्याची गती वाढवण्याचे आदेशही दिले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.