टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना व संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या संयुक्त विद्यमानाने बेळगाव शहर शिक्षकांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन शनिवार ता, 18 रविवार ता, 19 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.
अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात टिळकवाडी माध्यमिक शारीरिक शिक्षक संघटनेची बैठक संपन्न झाली या बैठकीत बेळगाव शहर शिक्षकांसाठी विविध स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला संत मीरा शाळेची 40 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला, प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, क्रीडाशिक्षक विवेक पाटील, प्रवीण पाटील, जयसिंग धनाजी, उमेश बेळगुंदकर, सोमशेखर हुद्दार, अर्जुन भेकने, चंद्रकांत पाटील,बी जी सोलोमन यांच्या हस्ते दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनी शाळेची 40 वर्षपूर्ण झाल्याबद्दल बेळगाव शहरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी सांघीक पुरुषांसाठी व्हॉलीबॉल व महिलांसाठी थ्रोबॉल व वैयक्तिक स्पर्धा 40 वर्षाखालील ,40 वर्षावरील, व मुख्याध्यापक गट अशा तीन गटात 60 मी धावणे, गोळा फेक, संगीत खुर्ची, स्लो सायकलींग, रिले लिंबू चमचा,दोरीवरच्या उड्या, अशा स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर स्पर्धा 18 व 19 डिसेंबर रोजी संत मीरा शाळेच्या मैदान वर घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक शालेय शिक्षक संघानी आपली नावे 10 डिसेंबर पूर्वी स्पर्धासचिव चंद्रकांत पाटील संत मीरा शाळा अनगोळ, विवेक पाटील ठळकवाडी शाळा टिळकवाडी, यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
संत मीरा शाळेत कनकदास जयंती साजरी.
अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत संत कनकदास जयंती साजरी करण्यात आली.
प्रमुख पाहुणे शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका वंदना शिरोडकर ,सुनिता मराठे, चंद्रकांत तुर्केवाडी, यांच्या हस्ते संत कनकदास यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले, याप्रसंगी विद्यार्थी शिवप्रसाद गौंडा याने कनकदास जयंती बद्दल आपले विचार मांडले व कनकदास यांच्या कार्याचा आढावा घेतला , याप्रसंगी शिक्षिका माणिक उपाध्याय मिनाश्री तुकार क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील पाटीलसह शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.शिक्षिका कांचन तुक्कार हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले