कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्याच्या 13 ते 24 तारखे दरम्यान होणार आहेत. अधिवेशन काळात कोणत्याही प्रकारचे आंदोलन करावयाचे असल्यास पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
विधानसभेच्या अधिवेशन काळात आंदोलन करणारे, निवेदन देणाऱ्यांना सर्वप्रथम पोलीस आयुक्त कार्यालयात हजर राहून पूर्वकल्पना द्यावी लागणार आहे. आंदोलन का?कशासाठी?मागण्या कोणत्या? संघटनेचे नाव? आंदोलनाचे स्वरूप?तसेच आंदोलन करणाऱ्या संघटनेचे अध्यक्ष किंवा नेतृत्व करणाऱ्यांचा पूर्ण नाव, पता, इमेल अड्रेस, मोबाईल क्रमांक ही सर्व माहिती द्यावी लागणार आहे.
हलगा गावा जवळ असलेल्या सुवर्ण गार्डन या आंदोलनस्थळी टेंट घालून आंदोलन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान हे ठिकाण वगळता इतर कोणत्याही स्थळी आंदोलन करण्याची परवानगी नसून याची काळजी न घेतल्यास कारवाईचा सामना करावा लागणार आहे.
कोणत्याही परवानगी शिवाय आंदोलन करता येणार नाही. तसेच विनापरवाना धरणे, मोर्चा, सत्याग्रह काढता येणार नाही. दरम्यान परवानगी देण्यासाठी पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
अधिक माहितीकरिता
गुन्हे विभाग 0831-2471577,
9480804109 किंवा
9448185837 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.