Monday, November 25, 2024

/

बार असो.अध्यक्षपदासाठी इच्छुकांचे संबोधन

 belgaum

बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या दोन्ही वकील उमेदवारांनी आज उपस्थित वकिलांना संबोधित करून आपापली बाजू मांडली.

बेळगाव न्यायालय आवारातील ॲडव्होकेट समुदाय भवनाच्या ॲड. डी. बी. दीक्षित सभागृहामध्ये आज दुपारी हा अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांसाठी संबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्वाचन अधिकारी संजय तुबची हे होते बेळगाव बार असोसिएशनच्या होऊ घातलेल्या निवडणुकीतील अध्यक्षपदासाठी ॲड. दिनेश एम. पाटील आणि ॲड. प्रभू यतनट्टी हे दोन वकील इच्छुक आहेत. या दोन्ही वकील उमेदवारांनी आजच्या कार्यक्रमात आपापली बाजू मांडली.Bar president contestant

आपण अध्यक्षपदाची निवडणुक का लढवत आहोत? अध्यक्षपदी निवडून आल्यास आपण कोण कोणती कामे आणि कोण कोणत्या सुधारणा करणार आहोत आदींबाबत सविस्तर माहिती देण्याद्वारे अध्यक्षपदासाठी आपणच किती योग्य आहोत हे ॲड. दिनेश एम. पाटील आणि ॲड. प्रभू यतनट्टी यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमास वकीलवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.