दिवाळीचा आनंद सर्वांना मिळावा या उद्देशाने बबन भोबे मित्र मंडळातर्फे शहरातील विविध संस्थांना तेल, साबण आदी साहित्यासह दिवाळीच्या फराळचे वाटप करण्यात आले.
समादेवी गल्ली येथील हनुमान टेलिफोन बूथ याठिकाणी आज सकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बबन भोबे मित्र मंडळाचे अध्यक्ष बबन भोबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते शहरातील नंदन मक्कळ धाम, समृद्धी फौंडेशन, शारीरिक अपंगांची संस्था अळवाण गल्ली आणि केळकर बाग येथील कन्नड शाळा क्रमांक 9 यांना तेल, साबण आदी साहित्यासह फराळाचे वाटप करण्यात आले. अटॅकचे संस्थापक विनोद बामणे यांनी यावेळी उपस्थित मुलांना मिठाईचे वाटप केले
सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामीण भागात यंदाच्या एसएसएलसी परीक्षेत 98 टक्के गुण मिळवून विभागात प्रथम आलेल्या सुदर्शन राक्षे याचा आमदार ॲड. अनिल बेनके, डी. बी. पाटील व बबन भोबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुदर्शन याच्यातील गुणवत्ता लक्षात घेऊन अपटेकचे विनोद बामणे यांनी त्याला 6 महिन्याचे संगणक प्रशिक्षण मोफत देण्याचे यावेळी जाहीर केले.
कार्यक्रमास मंदा नेवगी, डी. बी. पाटील, शंकर पावशे, रमेश पवार, मनोहर शिरोडकर, रघुनाथ चव्हाण, बबन भोबे मित्र मंडळाला मदत करणारे ॲड. भाविमणी, डाॅ. संतोष शिंदे, प्रकाश पवार, न्यू उदय भवन, संजय गवई, बाबुलाल शहा, प्रकाश पोरवाल आदींसह भाऊ संख्या हितचिंतक उपस्थित होते. मंदा नेवगी आणि शेवटी सर्वांचे आभार मानले.