आफ्रिकेत आफ्रिकेत कोरोनाचा व्हायरंट घातक होत असल्याच्या पाश्वभूमीवर अनेक ठिकाणी प्रवेशासाठी कोरोनाच्या दोन लसी बंधनकारक केल्या आहेत तर महाराष्ट्र, केरळमधून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी कोविड चाचणी आवश्यक आहे.खबरदारीचा उपाय म्हणून, कर्नाटकाने केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी कोविड चाचणी अनिवार्य केली आहे,असे शनिवारी जाहीर करण्यात आले.
धारवाड, म्हैसूर आणि बेंगळुरू येथील वैद्यकीय महाविद्यालयात नवीन ओमिक्रॉन प्रकार तसेच कोविडचा उद्रेक होण्याची भीती असताना लसीकरणासह जागरूकता आवश्यक आहे.
आरोग्य आयुक्त गौरव गुप्ता यांनी शनिवारी यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.प्रवाशांची तपासणी करण्यासाठी आणि कोविड चाचण्या घेण्यासाठी प्रमुख बसस्थानक, टर्मिनल आणि रेल्वे स्थानकांवर विशेष पथके नेमण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
एका बैठकीला संबोधित करताना, त्यांनी सांगितले की त्यांनी शहराच्या बाहेरील भागात आणि सीमेवर चाचण्या घेण्यासंदर्भात आवश्यक सूचना केली आहे.
बेंगळुरूमध्ये गेल्या आठवड्यात 160 कोविड प्रकरणे समोर आली आहेत.तथापि,शुक्रवारी 224 प्रकरणे नोंदवली गेली आणि आणेकल प्रदेशात अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. अधिकाऱ्यांना दक्ष राहावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
कोविड प्रकरणांचा एकही क्लस्टर समोर येणार नाही हे पाहण्यासाठी खबरदारीच्या उपायांची अंमलबजावणी करावी.
नवीन प्रकार शोधण्यासाठी अधिका-यांना जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्यासाठी जोरदार तयारी करावी लागेल अशा सूचना करण्यात आल्या आहेत.