शुक्रवारी सायंकाळी बेळगाव चतुर्थ दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर शनिवारी सकाळी ठेकेदाराने मच्छे येथे हलगा मच्छे बायपासचे काम सुरूच ठेवले होते मात्र ठेकेदाराना जाब विचारताच काम बंद करण्यात आले.
शुक्रवारी सायंकाळी बायपासच्या स्थगिती मिळाल्याची बातमी सर्वत्र पसरली होती अनेक ठिकाणी शेतकऱ्यान समाधान व्यक्त करण्यात आले होते शुक्रवारी मच्छे येथील शेतकरी अनिल अनगोळकर यांनी जाब विचारताच कामगारांनी काम बंद केले.
हलगा मच्छे बायपास मध्ये संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीत भात पीक आहे गेल्या आठवडा भरापासून पाऊस पडल्याने पाणी देखील साचलं आहे बायपास परिसरात चार जे सी बी आणि झोपडी आहे त्यामुळे काम जरी बंद असले तरी ठेकेदाराने न्यायालयाचा अवमान करू नये अशी भावना व्यक्त होत आहे.
गेल्या तीन दिवसापासून पडणाऱ्या मोठ्या पावसाने कापणी केलेले व बांधलेले भातपीकं पाण्यात गेली आहेत त्याचबरोबर बेकायदेशीर बायपासच्या वरील भागातील पीकं अक्षरशः पाण्यात आहेत याचा प्रशासन कधीतरी विचार करणार आहे कि नाही ? बायपासची ना वर्क ऑर्डर, नां मा.उच्च न्यायालयाची स्थगिती उठलेली प्रत,नां आताच्या बायपासमधे जमीन भूसंपादन केलेली शेतकऱ्यांची नावं,त्यांचे सर्वे नंबर,किती शेतकऱ्यांची किती जमीन गेली आणी किती पैसे दिले याचा तपशील आजपर्यंतही दिली नसल्याने सदर बायपास कायदेशीर आहे कि बेकायदेशीर हे कळून येते अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राजू मरवे यांनी बेळगाव Live शी बोलताना दिली.
बेळगावचा झिरो पॉईंट नक्की कुठे आहे आणी तो हालगा येथे बदलला असेलतर कोणत्या नियमांचे पालन केँले,तो बदलायचा असेलतर कुणी,कसा बदलायचा असतो याची माहिती येथील अधिकाऱ्यांना देतील का ? कि छोट्या शेतकऱ्यांची सुपीक जमीन मनमानी भूसंपादन करुन त्यांना संपवण्माच कटकारस्थान करुन आपल्याला हवातसा झिरो पॉईंट बदलणाऱ्यांना टाळ्यावर आणत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला तर येथील सरकारी अधिकारी शेतकरी व जनतेला कशाप्रकारे त्रास देतात हे कळेल असेही मरवे म्हणाले.