आदिकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज बेळगावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् । आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् II असा संदेश संपूर्ण जगाला देणाऱ्या भगवान वाल्मिकी यांचा आदर राखण्यासाठी
बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिशिष्ठ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पंचायतीच्या सभागृहात आज महर्षी वाल्मिकी जयंतीचे आचरण करण्यात आले होते.
महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.याप्रसंगी
बोलताना जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ म्हणाले, भारतीय महाकाव्य रामायणाची निर्मिती करणाऱ्या महर्षी वाल्मिकींनी लिहिलेल्या महाकाव्यातील पंक्तींप्रमाणे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आणि प्रशासनाने उत्तम सुशासन आणले तर ते रामराज्य ठरेल.
महर्षी वाल्मिकी हे सृष्टीचे निर्माते आहेत. आपल्या जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमातीतील विद्यार्थ्यांना, भूमिहीन शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी लाभ मिळवून देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी दुडगुंटी, वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष राजशेखर तळवार, समाज कल्याण विभागाच्या सहसंचालिका उमा सालीगौडर ,डीसीपी विक्रम आमटे, बेळगावचे उपविभागाधिकारी रवींद्र करलिंगन्नवर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.