पंडित दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचा एक भाग म्हणून शहरातील नरगुंदकर भावे चौक येथे रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी व्हेंडिंग झोन तयार करण्यासाठी आज पाहणी करण्यात आली.
शहरातील नरगुंदकर भावे चौकात अनेक फेरीवाले, भाजी विक्रेते आपल्या उपजीविकेसाठी भाजी विक्री, फळ विक्री, साहित्य विक्री करतात. मात्र त्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होऊन रहदारीची समस्या निर्माण होत असते.
ही समस्या निकालात काढण्यासाठी याठिकाणी व्हेंडिंग झोन अर्थात विक्री क्षेत्र तयार करण्याची योजना आहे. त्या अनुषंगाने आज बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी महापालिका आयुक्त व पोलिस अधिकाऱ्यांसमवेत भावे चौकात पाहणी केली.
पंडित दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत नर्गुंडकर भावे चौक येथे व्हेंडिंग झोन तयार केला जाणार असून त्याबाबतची प्रक्रिया लवकरच पार पाडली जाईल, असे आमदार बेनके यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच सदर प्रक्रियेसह व्हेंडिंग झोनला विक्रेते आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.