वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यूएचओ ने अलीकडेच इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड लोकांना कोविड लसीचा अतिरिक्त डोस देण्याची शिफारस केली आहे. कारण लसीकरणानंतर ब्रेकथ्रू इन्फेक्शनची जास्त संवेदनशीलता निर्माण करीत असल्याचा त्यांचा दावा आहे. अशा परिस्थितीत कर्नाटकात एकूण संख्येपैकी 50 टक्के हुन अधिक एच आय व्ही बाधित कोविड लसीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मिळाली असून ही माहिती धक्कादायक स्वरूपाची आहे.
आकडेवारी दर्शवते की कर्नाटकातील केवळ 22.36% एचआयव्ही रुग्णांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे तर 48.89% रुग्णांनी अद्याप फक्त पहिला डोस घेतला आहे. राज्यात 1.69 लाखांहून अधिक एचआयव्ही रुग्ण आहेत, जे अँटीरेट्रोव्हायरल थेरपी- एआरटी वर आहेत.
कर्नाटक नेटवर्क एड्स प्रिव्हेंशन सोसायटी KSAPS सोबत घनिष्ठपणे काम करते. केएनपी चे अध्यक्ष त्यागराज डी टी म्हणाले की राज्यातील किमान 11% एचआयव्ही रुग्णांना कोविडची लागण झाली आहे आणि त्यापैकी 42 जणांचा मृत्यू झाला आहे.
हे बरे झालेले कोविड रुग्ण लसीकरणासाठी तीन महिने कालावधी पूर्ण होण्याची वाट पाहत असताना, राज्यातील आणखी एक मोठी इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड लोकसंख्या आढळून येत आहे. ज्या रुग्णांवर अवयव प्रत्यारोपण करण्यात आले आहेत तशा रुग्णांची ही संख्या आहे. ज्यांना जिवंत व्यक्ती किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अवयव प्रत्यारोपित करण्यात आले आहेत. म्हणून त्यांना आजीवन इम्युनोप्रेसेन्टरवर ठेवले असून कोविड काळात त्यांची जास्त काळजी घ्यावी लागत आहे.