कर्नाटक राज्यातील शिक्षक बदलीला केएटीकडून देखील हिरवा कंदील मिळाल्यामुळे आता शिक्षक बदली प्रक्रियाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच शिक्षक बदलीसाठीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.
राज्यात यापूर्वी शिक्षक बदलीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर काहींनी या बदली प्रक्रियेला आव्हान देत केएटीकडे धाव घेतली होती. परिणाम ही बदली प्रक्रिया स्थगित झाली होती.
तथापि केएटीने आता सदर बदली प्रक्रिया राबविण्यास परवानगी दिली आहे. शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी देखील शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.
यामुळे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.