बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली होती.
या संदर्भात आवश्यक ती कारवाई आणि चौकशी करण्याचे आदेश डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हीएशन ने दिले आहेत, त्यामुळे सांबरा विमानतळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
हैदराबाद हुन येणारे विमान पायलटने बेळगाव विमानतळाच्या अवकाश टप्प्यात आणले असता त्याला धावपट्टीवर उतरण्याची सूचना देण्यात आली. मात्र उतरत असताना एअर ट्राफिक कंट्रोल च्या सूचनांचा चुकीचा अर्थ घेऊन धावपट्टीवर विमान चुकीच्या पद्धतीने उतरले अशी तक्रार झाली होती .
यासंदर्भात एका इंग्रजी वर्तमानपत्राने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर चौकशी सुरू झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
संपूर्ण चौकशी होईपर्यंत त्या विमानातील दोघा पायलटना काम थांबवण्याची सूचना करण्यात आली असून चौकशीनंतरच त्यांचा निर्णय घेतला जाणार आहे.