बुडात बैठका व्यवस्थित होत नसल्याने आणि नागरी समस्यावर दुर्लक्ष केल्याने माजी मंत्री कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी मनपा आणि बुडा अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
के पी सी सी चे कार्याध्यक्ष आणि यमकनमर्डी मतदारसंघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी आज महानगरपालिकेला भेट दिली, अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध नागरी समस्या संदर्भात त्यांनी चर्चा केली .
बेळगाव शहराची नागरी समस्या सोडवण्याची जबाबदारी महानगरपालिकेवर आहे .यासंदर्भात संपूर्ण शहराच्या समस्यांकडे अधिकारी वर्गाने लक्ष वेधले पाहिजे याकडे लक्ष देण्यासाठी स्वतः आपण भेट दिली असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे.
बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर याही यावेळी उपस्थित होत्या. महानगरपालिकेत स्वतंत्र बैठक घेऊन नागरी समस्या सोडविण्याचे आवाहन यावेळी सतीश जारकीहोळी यांनी केले आहे.
यापूर्वी सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून जबाबदारी निभावली आहे. बेळगाव महानगरपालिकेशी चांगला संबंध प्रस्थापित ठेवून नगरसेवकांच्या माध्यमातून त्यानी विकास करून घेतला आहे. सध्या ते कोणत्या पदावर नसले तरी ते एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यानी महानगरपालिकेशी संपर्क करून आढावा घेतला आहे.