विरोधी असावेत जर विरोधक नसतील तर आम्ही सुस्त होतो मात्र राजकारणात हेल्दी स्पर्धा असावी मात्र वैयक्तिक द्वेष नसावा कुणीही वक्तव्य करताना सांभाळून कराव असा सल्ला सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव ग्रामीण मध्ये पेटलेल्या त्या वादा बाबत दिला आहे.
बेळगाव ग्रामीण भाजप मध्ये दोघे जण शड्डू ठोकून उभे आहेत त्या दोघात स्पर्धा आहे त्यामुळे हा वाद वाढला असेल,मात्र विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे बाकी आहेत तो पर्यंत त्या दोघांची चड्डी टिकायला हवी असा टोला देखील त्यांनी लगावला.बेळगाव काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पॉलिटिक्स मध्ये कोणतीही टीका निगेटिव्ह घेण्याऐवजी पॉजिटिव्ह घ्यावी ग्रामीण भागात विकास काम झालं आहे त्यामुळे असे वाद होत आहेत असेही ते म्हणाले.
अरबाज मुल्ला खून प्रकरणी-डी सी एस पी तपास करावा अशी मागणी करणार मात्र सध्या आंदोलन करणार नाही. या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणार आहे. या प्रकरणी अधिक माहिती आम्ही घेत आहोत पोलिसांनी लवकर तपास करून सत्य बाहेर काढावे अस त्यांनी म्हटलंय.
मी पुन्हा लोकसभा निवडणुकीला बसणार बेळगाव लोकसभा जिंके पर्यंत मीच उमेदवार असेन असेही जारकीहोळी म्हणाले.राहुल किंवा प्रियंका यांना यमकनमर्डीत मतदारसंघात उभे करणार का?यावर बोलताना त्यांनी हा निर्णय जनतेवर अवलंबून असेल लोकांनी सांगितले तर बघूया असे म्हणाले.
काँग्रेसमध्ये बंडखोरी नाही मोठा जिल्हा आहे विधान परिषदेसाठी सात जण इच्छुक आहेत सर्वांचे अर्ज वर पाठवणे आमचे काम आहे वरिष्ठ नेते कुणाला उमेदवारी ध्यायचे ते ठरवतील असे सतीश यांनी नमूद केलं.