माहिती हक्क कार्यकर्ता आणि स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्या भीमाप्पा गडाद याने कर्नाटक सरकारकडे विचित्र मागणी केली आहे.
कर्नाटकातील सर्व सरकारी कार्यालयांवर 25 ऑक्टोबर पर्यंत लाल पिवळा कर्नाटक ध्वज लावण्यात यावा. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. असा इशारा त्यांनी दिला आहे.
त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा दिला असून आपली मागणी लवकरात लवकर मान्य करावी असे त्यांनी म्हटले आहे. कर्नाटक सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्यावेत आणि प्रत्येक सरकारी कार्यालयांवर कर्नाटकाचा झेंडा लावण्यात यावा असे त्यानी म्हटले आहे.
24 नोव्हेंबर 2014 पासून ही मागणी आपण करत आहोत. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केंद्र सरकारकडे या फलकाच्या संदर्भातील योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली आहे. असे असताना कन्नड ध्वज लवकरात लवकर लावण्याची गरज आहे अशी मागणी त्यांनी केली आहे.