Thursday, December 26, 2024

/

त्या घटनेची दखल घेतली पंतप्रधानांनी

 belgaum

बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी येथे पावसामुळे घराची भिंत कोसळून सात जण दगावल्याच्या घटनेची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर आता पंतप्रधानांनी प्रत्येक मृताला दोन लाख रुपये पंतप्रधान राष्ट्रीय रिलीफ फंडातून देण्याची घोषणा केली आहे.

बेळगाव कर्नाटक मध्ये झालेली घटना अतिशय क्लेशदायक असून या घटनेमुळे अतिशय दुःख झाले आहे. त्यामुळे ही रिलीफ निधी आपण देत असल्याचे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून जाहीर केले आहे.

एकाच कुटुंबातील सहा जण आणि समोरच्या घरातील एक लहान मुलगी या पद्धतीने एकूण सात जण या घटनेत दगावले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. राज्यपातळीवर मुख्यमंत्र्यांनी सहाय्यता निधी दिला आणि सांत्वन केले असले तरी थेट पंतप्रधानांनी या घटनेची दखल घेतली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.