Friday, November 29, 2024

/

पोलिसांची गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम

 belgaum

बेळगाव शहर आणि तालुक्यातील सर्व पोलिस स्थानकांनी आज शनिवारी गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबून आपापले पोलीस स्थानक आणि आसपासचा परिसर लखलखित केला.

महात्मा गांधी जयंती निमित्त शहरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या मार्केट पोलीस स्थानकाचे प्रमुख सीपीआय मल्लिकार्जुन तुळशीगेरी यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली आज सकाळी 7 वाजल्यापासून स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले. या अभियानात स्वतः सीपीआय तुळशीगेरी यांच्यासह पीएसआय मंजुनाथ नायक तसेच अन्य पीएसआय, एएसआय, हवालदार व पोलीस कॉन्स्टेबल सहभागी झाले होते. या सर्वांनी पोलीस स्थानकाची झाडलोट करण्याबरोबरच आवाराची स्वच्छता केली. पोलीस स्थानकाचा प्रवेश मार्ग पाण्याने धुऊन स्वच्छ केला.

याव्यतिरिक्त सीपीआय मल्लिकार्जुन तुळशीगेरी यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती बस स्थानकासमोरील रस्त्याची झाडलोट करण्यात आली. रस्त्याशेजारी दुकानांची खोकी, हातगाड्यांच्या ठिकाणीचा कचरा हटविण्यात आला. विशेष म्हणजे मार्केट पोलीस स्थानक व्याप्तीतील 7 बस थांब्यांच्या ठिकाणी साचलेला केरकचरा काढून या बसथांब्यांची साफसफाई करण्यात आली. मार्केट पोलिसांची ही स्वच्छता मोहीम सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू होती

कॅम्प पोलीस ठाण्याच्या ठिकाणीदेखील आज गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी सीपीआय प्रभाकर धर्मट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पोलीस स्थानकाची झाडलोट करून जमीन धुऊन साफसुफ करण्यात आली. तसेच पोलीस स्थानकावर आणि आसपासच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.Police station mohim

मार्केट व कॅम्प पोलीस स्थानकांप्रमाणे खडेबाजार पोलीस स्थानक, टिळकवाडी पोलीस स्थानक, रहदारी दक्षिण व उत्तर पोलीस स्थानक, शहापूर पोलीस स्थानक, उद्यमबाग पोलीस स्थानक, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाणे, काकती पोलीस स्थानक, हिरेबागेवाडी पोलीस ठाणे आणि मारीहाळ पोलीस स्थानकांतर्फे आज गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदर स्वच्छता मोहिमेमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांना बरोबरच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग दर्शविला होता.

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपापल्या पोलिस स्थानकांची साफसफाई करण्याबरोबरच आसपासच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी परिसरातील अवास्तव झाडेझुडपे व जमिनीवर उगवलेले रान हटविण्यात आले. सकाळी सकाळी हातात झाडू -टोपल्या घेऊन साफसफाईच्या कामात गर्क असलेले पोलीस कर्मचारी सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.