बेळगावच्या मैत्री महिला अधिकारी क्लबच्या वतीने मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांच्याकडे 1 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
कांबळी खुट आणि परिसरात भाजी विक्री करणाऱ्या महिलांसाठी खास स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी आणि त्यासाठी हा निधी वापरण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
या भागात भाजी विक्री करून गुजराण करणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृहाची कमतरता त्यांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. यासाठी ही व्यवस्था तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे.
क्लबच्या अध्यक्ष मैत्रेयी बिस्वास यांनी हा निधी सुपूर्द केला.
क्लबच्या सचिव सुनंदा करलिंगन्नावर, कन्नड व संस्कृती खात्याच्या निर्देशक विद्यावती बजंत्री,सदस्य रेखा पाटील,आरती अंगडी,शोभा पाटील,लता अरकेरी आदी उपस्थित होते.
महिलावर्गाच्या आरोग्य जोपासणे अतिशय गरजेचे आहे अशा परिस्थितीत भाजी विक्री करून जगणाऱ्या महिलांच्या आरोग्याची काळजी महानगरपालिका प्रशासनाने घ्यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली.