Saturday, November 16, 2024

/

खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून होणार बेळगावचे रक्षण?

 belgaum

सीमाभागातील मराठी माणूस कधीही अडचणीत आला की शिवसेना नेते खासदार संजय राऊत नेहमीच मदतीला येतात. सध्या रोगराईचा काळ सुरू आहे आणि बेळगावकरांना खऱ्या अर्थाने आरोग्यरक्षणाची गरज आहे. आरोग्य रक्षण करण्याची जबाबदारी शिवसेनेने उचलली आहे खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून बेळगावकरांना आरोग्यरक्षण मिळणार आहे.

यासंदर्भात शुक्रवारी खुद्द खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा करून नियोजन करण्यात आले आहे. बेळगाव शिवसेनेच्या आरोग्य मदत कक्षाचे प्रमुख आणि जिल्हा समन्वयक दत्ता जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिवसेना नेते संजय राऊत यांची आज शुक्रवारी गोवा मुक्कामी भेट घेऊन बेळगावातील परिस्थितीबाबत चर्चा केली.

गोवा येथे शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात दत्ता जाधव यांच्या समवेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सागर पाटील, बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी आदींचा समावेश होता.Sena raut

बेळगावात शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य मदत कक्षाला महाराष्ट्र शासनाकडून कशी मदत मिळवता येईल ,बेळगावातील रुग्णांना महाराष्ट्रात कसे उपचार मिळतील यावर सविस्तर चर्चा झाली. बेळगाव आणि परिसरातील मराठी माणूस उपचारांसाठी विविध इस्पितळांमध्ये जातो. मात्र त्यांना माफक दरामध्ये उपचार मिळत नाहीत. अशा वेळी शिवसेना आरोग्य मदत कक्षाच्या माध्यमातून कोणती उपाययोजना करता येईल या संदर्भात विशेष चर्चा करण्यात आली.

सदर भेटीप्रसंगी बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला पत्करावा लागलेला पराभव व त्याची कारणे व आगामी जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली.
या निवडणुकांच्या अनुषंगाने रणनीती आखण्याबाबत विचार विनिमयही करण्यात आला. जवळपास एक तास झालेल्या चर्चेनंतर मविआ सरकार बेळगावातील मराठी भाषिकांच्या पाठीशी आहे असे आश्वासन यावेळी राऊत यांनी दिले.

दरम्यान, पुढील नोव्हेंबर महिन्यात शिवसेना नेते संजय राऊत हे स्वतः खास बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. या दौर्‍यामध्ये राऊत यांच्याकडून म. ए. समिती व शिवसेनेला अधिक बळकट करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.