Thursday, November 28, 2024

/

म.ए.समितीने विधान परिषद निवडणूक लढवायलाचं हवी

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील दोन जागांसाठी विधान परिषद निवडणुकीची लवकरच घोषणा होणार असून त्या दृष्टीने राष्ट्रीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.के पी सी सी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी जिल्ह्यात एका जागेवर काँग्रेस निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यानंतर वातावरण ढवळून निघाले आहे.

काँग्रेसकडून माजी मंत्री चिकोडीचे माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून ग्रामीण आमदारांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी आणि माजी मंत्री वीरकुमार पाटील हे देखील काँग्रेस उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.भाजपा कडून विधान परिषदेचे मुख्य सचेतक महंतेश कवटगीमठ रिंगणात असतील विद्यमान सदस्य विवेकराव पाटील आणि लखन जारकीहोळी देखील अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असण्याची शक्यता आहे.

बेळगाव जिल्ह्यातील आमदार खासदार, ग्राम पंचायत सदस्य, महापालिका नगरपालिका आणि नगर पंचायत सदस्य तालुका पंचायत जिल्हा पंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो.तालुका, जिल्हा पंचायतीचा अवधी संपल्याने सध्या त्या सदस्यांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असणार नाही मात्र तालुका जिल्हा पंचायत निवडणूक विधान परिषद निवडणुकीच्या अगोदर झाल्यास ते सदस्य देखील मतदार होऊ शकतात. सहा वर्षा नंतर येणाऱ्या या निवडणुकीत बारा तालुक्यातील बारा हजार मतदार आहेत त्यामुळे भाजप काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांची संख्या पहाता ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

अथणी पासून खानापूर पर्यंत मराठी मतदार पसरला असल्याने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला नव्याने आपले कार्य विस्तारीकरण करण्याची नामी संधी आली आहे.सांगली कोल्हापूर यांच्या सीमांशी हा पुर्ण भाग निगडित असल्याने अनेक मराठी नेत्यांचे या भागांत संपर्क व प्रस्थ आहे या पाश्वभूमीवर महाराष्ट्रातील मराठी नेते व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती यांनी संयुक्तपणे काम केल्यास लक्षणीय यश मिळू शकते.Mes logo

मराठी माणसाचा वारंवार अपमान करणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना या निमित्ताने चांगलाच चाप बसवण्याची संधी आली आहे मध्यवर्ती समितीने दोन्ही जागेवर आपले उमेदवार उभे करून पूर्ण बेळगाव जिल्ह्यात परत एकदा सीमा प्रश्नाचा जागर करून आपली पाळेमूळ घट्ट करावीत अशी मागणी वाढू लागली आहे.

प्रत्येक निवडणुकीत समितीने आपले उमेदवार देऊन मराठी मते कायम शाबूत ठेवण्याची काळाची गरज आहे. मराठी माणूस अजूनही समितीशीच निगडित आहे त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीत सव्वा लाख मते मिळाली आणि हीच मराठी मते राष्ट्रीय पक्षाकडे न जाता समितीकडे शाबूत राहिली त्यामुळे मनपा निवडणुकीत समितीचे उमेदवार विजयी झाले नसले तरी मतांचा टक्का वाढला आणि राष्ट्रीय पक्षा पेक्षा जास्त मते समितीला मिळाली. आगामी निवडणुकात मराठी मते आपल्याकडे ठेवण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला आपली वोट बँक बहाल करू नये., अशी रणनीती समितीची असली पाहिजे अशी मागणी वाढत आहेत.

बेळगाव जिल्ह्यात पसरलेल्या मराठी माणसांचे एकत्रीकरण करण्याची संधी समिती नेतृत्वाने दवडू नये, समितीचे अच्छे दिन परत आणावेत आणि या निमित्ताने महाराष्ट्रातील मराठी नेत्यांना सीमा भागाविषयी किती कळवळा आहे हे देखील तपासता येईल.सेना खासदार संजय राऊत यांनी सीमासमन्वयक मंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांना कानपिचक्या दिल्या होत्या, ते ही या निवडणुकीचच्या संधीचे सोने करतील त्यामुळे ही निवडणूक देखील समितीच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.