मोटरसायकलवरून जाणारा एक युवक गळ्यात पतंगाचा मांजा अडकून जखमी झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी कपलेश्वर उड्डाणपुलावर घडली.
यल्लाप्पा भिमाप्पा चतुर (वय 30, रा. यरमाळ) असे जखमी युवकाचे नांव आहे. काल रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कपिलेश्वर उड्डाणपुलावरून मोटरसायकलवरून जात असताना गळ्यात मांजा अडकल्यामुळे तो रस्त्यावर खाली कोसळला.
सुदैवाने मोटरसायकलीचा वेग कमी असल्यामुळे यल्लाप्पा याला किरकोळ दुखापती शिवाय कांही झाले नाही. त्याच्यावर नजीकच्या खाजगी इस्पितळात उपचार करण्यात आले आहेत.
गेल्या कांही वर्षात पतंगाच्या मांजामुळे काहींना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. डॉ. डी. सी. राजाप्पा पोलीस आयुक्त असताना त्यांनी माझ्या विक्रीवर बंदी घातली होती.
किराणा व स्टेशनरी दुकानात तपासणी करून मांजा जप्त करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली होती. मात्र पोलीस आयुक्त डॉ. राजाप्पा यांची बदली होताच ही मोहीम बारगळली. त्यानंतर आता पतंगाचा मांजा पुन्हा डोकेदुखी ठरू लागला आहे.