Thursday, January 9, 2025

/

सायबर फसवणुकीत गमावलेले 1.44 कोटी मिळवून केले परत

 belgaum

गेल्या वर्षभरात 1309 सायबर आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी बेळगावच्या सी ई एन पोलिस स्थानकात करण्यात आल्या होत्या जेथे फसवणूकीची किंमत 2,45,37,052 इतकी होती.हॅकर्सशी संबंधित सुमारे 1825 बँक खाती गोठवण्यात आली आहेत आणि या खात्यांमधील 2,33,09,350 इतकी रक्कम गोठवण्यात आली आहे. त्यातून, फसवणुकीत पैसे गमावलेल्या तक्रारदारांना तब्बल 1,44,99,003 ची परतफेड करण्यात आली आहे.

नागरिकांनी सायबर फ्रॉड्सची तक्रार सी ई एन पोलीस आणि संबंधित बँकांना “एक तासाच्या आत” करताना “गोल्डन अवर नियम” पाळणे आवश्यक आहे.जर ते सी ई एन पोलिस स्टेशनला भेट देऊ शकत नसतील तर त्यांनी ERSS 112 किंवा CEN पोलिस स्टेशन 0831-2950320 वर कॉल करावा आणि फसवणुकीचे तपशील आणि बँक तपशील द्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

आर्थिक फसवणुकीचे बळी सी ई एन पोलिस स्टेशनला भेट देऊन तक्रार दाखल करू शकतात आणि पोलिसांकडून सायबर क्राइम इन्सिडेंट रिपोर्ट CIR म्हणून गुन्हा नोंदवला जाईल आणि CIR कंट्रोल रूममधील सायबर क्राइम अधिकार्‍यांकडे हस्तांतरित केला जाईल.

त्यानंतर पोलीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोबत दोन तासांच्या सुवर्ण कालावधीत लाभार्थीचे खाते गोठवण्यासाठी काम करतील.Cyber police

तुमची आधार, पॅन कार्ड आणि बँक खाते माहिती खाते क्रमांक, डेबिट/क्रेडिट कार्ड क्रमांक ही खाजगी माहिती आहे, ती कोणाशीही शेअर करू नका.OTP यंत्रणा हा सर्व प्रकरणांमध्ये दुसरा पासवर्ड म्हणून वापरला जातो, म्हणून तो कुणालाही देऊ नका, फक्त तुम्ही तुमचा OTP टाकला पाहिजे, फोनवर तो कधीही देऊ नका, असेही आवाहन करण्यात आले आहे.

बेळगाव येथे खालील संदर्भात फसवणुकी झाल्या असून तक्रारीही नोंदविण्यात आल्या आहेत-
ओएलएक्स संबंधित, ओटीपी संबंधित, फेसबुक बनावट प्रोफाइल, क्यूआर कोड, गिफ्ट स्कॅम, टूर बनावट घोटाळे, बनावट वेबसाइट, हर्बल औषधे, तिकीट बुकिंग घोटाळा, बनावट ग्राहक सेवा ऑनलाइन घोटाळा आणि असेच इतर काही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.