Monday, December 2, 2024

/

त्या 3,000 उमेदवारांनी पाहिलाच नाही केसीईटीचा निकाल

 belgaum

कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट केसीईटी 2021 मध्ये 3,000 पेक्षा जास्त उमेदवारांनी त्यांची कामगिरी जाणून घेण्याची तसदी घेतलेली नाही.
केसीईटी 2021 चे निकाल जाहीर होऊन जवळपास पंधरवडा झाला आहे, परंतु या उमेदवारांनी त्यांच्या निकालासाठी कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाशी (केईए) संपर्क साधला नाही.
यावर्षी, केईएने अनेक कागदपत्रे सादर न केल्यामुळे सुमारे 12,000 उमेदवारांचे निकाल रोखले होते. यापैकी 9,000 जणांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली आणि त्यांचे निकाल जाणून घेतले. परंतु उर्वरित 3,000 जणांनी ना त्यांची कागदपत्रे सादर केली आहेत ना निकालांबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.

केईए च्या अधिकाऱ्यांच्या मते, यातील अनेक उमेदवारांनी नीट आणि जेईई यासह विविध प्रवेश परीक्षा लिहिल्या आहेत.
दरवर्षी हा प्रकार सुरू आहे. काही उमेदवार परीक्षा लिहितात, परंतु त्यांचा निकाल मिळवण्यात रस नसतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्यांच्या मते, मागील वर्षांच्या तुलनेत यंदा ही संख्या वाढली आहे.
“बारावीची ची गुणपत्रिका आणि इतर कागदपत्रे सादर न केल्यामुळे निकाल रोखण्यात आले. या वर्षी ही संख्या थोडी वाढली आहे, ”
केईए अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ज्या 3,000 उमेदवारांनी त्यांच्या निकालावर दावा केला नाही, त्यापैकी बहुतांश ओसीआय अर्थात ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया उमेदवार होते.

KSET-Result
“या उमेदवारांनी न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे त्यांच्या परीक्षा येथे लिहिल्या आहेत. त्यांचे निकाल जाहीर करण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशाची आवश्यकता आहे, ”
यामुळे त्यांच्या क्रमवारीतील किमान 1,500 उमेदवारांना धक्का बसला आहे.
“जर हे उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले नसते, तर किमान 1,500 उमेदवारांची श्रेणी सुधारली असती,”
केईएने या उमेदवारांना ऑक्टोबरच्या अखेरीस कागदपत्र पडताळणी सुरू होईपर्यंत त्यांचे निकाल मिळवण्याची मुदत दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.