खानापूरचा युवक चिकोडीत बुडाला

0
1
water death budalela yuvak
 belgaum

खानापूर तालुक्यातील हारुरी येथील युवक चिकोडी तालुक्यातील दूधगंगा नदीत बुडाला आहे. मलीकवाड ता. चिकोडी येथे बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. राहुल बळीराम शिवटणकर असे बुडालेल्या युवकाचे नाव असून त्याचे वय 26 वर्षे आहे .

आपल्या काकाकडे कामासाठी गेलेला हा युवक नदीत पोहताना बुडाला आहे. सदलगा पोलीस व अग्नीशामक दलाचे जवान नदीत बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेत होते. राहुल याचे दत्तवाड येथील काका अनंत शिवटणकर यांनी चांदोरी येथे काम घेतले होते.

राहुल हा फरशी कटिंग चे काम करत होता. त्यासाठी गेल्या चार दिवसांपासून तो काकांकडे आला होता. दसऱ्यानिमित्त काका सोबत अंथरूण धुण्यासाठी गंगा नदीवर गेला. अंथरुण धुऊन झाल्यानंतर काका परत गावाकडे आले आणि तो आपल्या मित्रासोबत पोहायला गेला.

 belgaum

अचानक पोहताना बुडला गेल्यामुळे लागलीच पोलिस स्थानकाला खबर देण्यात आली. सदलगा पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले .तीन ते चार तास शोध घेऊनही राहुलचा मृतदेह अजून सापडलेला नाही.राहुल च्या पाठीमागे आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे. बुधवारी रात्री बेळगाव येथून एक तपास पथक रवाना होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.