कर्नाटक राज्यात साधेपणाने साजरा करा. मिरवणुका काढू नका. कोरोनाचे नियम आहेत .असे बेळगावच्या जिल्हाधिकार्यांनी यापूर्वी जाहीर केले आहे.
मात्र राज्योत्सव मिरवणूक मोठ्या प्रमाणात काढू द्या अशी मागणी कन्नड संघटना करत आहेत. या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली आहेत.
राज्योत्सव ची मिरवणूक काढण्याची संधी द्या. कर्नाटक राज्योत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर करावे आणि कर्नाटक राज्योत्सव मिरवणुकीवर घालण्यात आलेले निर्बंध दूर करावेत अशी मागणी कन्नड संघटनांनी केली आहे.
कोरोना चे नियम लावून सर्व प्रकारचे सण उत्सव आणि समारंभ यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्योत्सव मिरवणुकीवर ही बंदी घालण्यात आली असली तरी आता ही भव्य मिरवणूक करण्याची परवानगी द्या असा अट्टाहास कन्नड संघटना करत असल्याचे दिसून येत आहे.