पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नाही आणि कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावातील एक शेतकऱ्याने आपले जीवन संपविले आहे.
शेतकरी हनुमंत मुराचट्टी यांनी मंगळवारी आपल्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली.
जमिनीची लागवड करण्यासाठी, हनुमंतने वित्तीय संस्थांकडून काही लाख रुपयांचे कर्ज आणि लोकांकडून हातउसणे पैसे घेतले होते, मात्र कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे पिकाचे नुकसान झाल्यामुळे तो निराश झाला होता. त्याने वाढवलेले पीक जास्त पाण्यामुळे खराब झाले. यामुळे कर्ज कसे भरावे असा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता.
सदर 40 वर्षीय शेतकरी आपल्या शेतात बांधलेल्या घरात राहत होता, कुटुंबातील इतर सदस्य बाहेर गेले असताना त्याने आपले जीवन संपवले. या घटनेने खळबळ व्यक्त होत आहे.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जबाबत वित्तीय संस्था आणि सरकारने योग्य तो निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.