प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ राजसिंह सावंत बेळगाव मधील रुग्णांसाठी रुग्ण तपासणी व उपचारासाठी नियमितपणे बेळगाव मध्ये येणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या दुसर्या व चौथ्या रविवारी ते यश हॉस्पिटल महाद्वार रोड बेळगांव येथे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत उपचार देणार आहेत.
आपल्या शारीरिक आरोग्य बाबत आपण जागरूक असतो परंतु मानसिक व लैंगिक आरोग्याबाबत आपण ती जागृकता दाखवत नाही. लैंगिक समस्यांबाबत आपण कोणत्या डॉक्टरकडून उपचार घ्यावेत याबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये अनभिज्ञता आढळून येते. समस्या किंवा वंध्यत्व समस्या असलेल्या रुग्णांनी क्वालिफाईड सेक्सॉलॉजिस्ट सल्ला घेणे आवश्यक ठरते.
डॉ राजसिंह सावंत हे भारतातील आघाडीचे सेक्सॉलॉजिस्ट असून नॅशनल सेक्सॉलॉजिस्ट असोसिएशनचे ते जॉईंट सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत.सेक्सॉलॉजिस्ट म्हणून त्यांना अठरा वर्षाचा अनुभव असून 40 हजारांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.
त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. नुकताच त्यांना बेस्ट सेक्सॉलॉजिस्ट ऑफ द इयर 2021 हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
लैंगिक समस्या ,वैवाहिक समस्या तसेच वंध्यत्व समस्या असतील तर डॉ राजसिंह सावंत यांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. यासाठी रुग्णांनी रुग्णालयाशी किंवा अपाईंटमेंट घेण्यासाठी 9158810777 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.