६५ वर्ष धगधगणाऱ्या सीमालढ्यात सीमाप्रश्न सुटावा म्हणून निःपक्षपणे आणि त्याचा कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी.
भारताच्या माजी पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधींना या प्रश्नाचा अगदी जवळून अभ्यास होता. सुरवातीच्या काळात जेव्हा आंदोलन पेटले तेव्हा देखील त्यांनी बेळगाव भेट घेऊन या प्रश्नाची गंभीर दखल घेतली होती. सीमाभागातील मराठी कॉग्रेसजन हे त्यावेळी याबाबत आग्रही होते.
आज राष्ट्रीय पक्षातील मराठी लोक सीमालढ्याबाबत उघड भूमिका घेत नाहीत किंबहुना लढ्याच्या विरोधात भूमिका घेतात पण या गोष्टी इतिहासात देखील चुकल्या नाहीत . त्यामुळे त्याकाळात मराठी काँग्रेसजन हे वेगेळी भूमिका घेत होते. बाबुराव ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसमधील मराठी लोक लढ्यात राहिले होते. आणि त्यामुळेच इंदिरा गांधी यांनी वारंवार सीमालढ्याची दखल घेतली असावी.
पुढे १९६५ ला देखील प्रश्न सुटण्याच्या मार्गावर होता इंदिरा गांधी यांनी दोन महिन्यात आपण महाराष्ट्रात असाल असे देखील आश्वासन दिले होते पण त्याच वेळी भारतावर परकीय आक्रमण झाले आणि भारत पाकिस्तान युद्ध पेटल्यामुळे इंदिरा गांधी त्यात व्यस्त झाल्या सीमावासियांनी देखील देशाला महत्व दिले आणि प्रश्न तसाच स्थगित झाले. पुढे १९७३ च्या दरम्यान देखील इंदिरा गांधींनी सीमाप्रश्नासाठी पुढाकार घेतला होता.
आज फक्त महाजन अहवालाची चर्चा असली तरी त्याहून प्रभावी इंदिरा गांधी यांनी सीमा लढ्याचा तोड तिला होता आज त्याची देखील दखल घेतली पाहिजे. या सगळ्यात हा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित राहिला पण इंदिरा गांधी याना हा प्रश्न जवळून माहित असल्याने त्या हा प्रश्न सोडवू शकल्या असत्या पण राष्ट्रीय पातळीवरील सततच्या उलथापालथीमुळे त्यांचे दुर्लक्ष झाले हेही खरे.
३१ ऑक्टोबर १९८४ साली त्यांची हत्या झाली आणि सीमावासीयांना यामुळे मोठा धक्काच बसला. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आठवण करताना राहून राहून एक गोष्ट सलते कि श्रीमती इंदिरा गांधी अजून काही वर्षे हयात असत्या तर नक्कीच सीमाप्रश्न सुटला असता. इंदिरा गांधींना विनम्र अभिवादन.
– पियुष नंदकुमार हावळ