कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळ आणि नुतन नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या सहयोगातून प्रभाग क्र. 10 मधील प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या घरी दिवाळी साजरी व्हावी, या उद्देशाने ‘ना नफा -ना तोटा’ तत्त्वावर फराळाचे जिन्नस उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शहरातील प्रभाग क्र. 10 मधील सर्वसामान्यांसह गोरगरिबांच्या घरी दिवाळी साजरी व्हावी, या उद्देशाने एकता युवक मंडळ, नगरसेविका वैशाली भातकांडे आणि सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण तोपिनकट्टी यांच्या पुढाकाराने कांगली गल्ली येथे फराळ बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
सदर फराळाचे साहित्य ना नफा -ना तोटा तत्त्वावर प्रभागातील नागरिकांपर्यंत पोचविले जाणार आहे. दिवाळीनिमित्त बनविण्यात येणाऱ्या या फराळामध्ये कच्चा चिवडा, पक्का चिवडा, बेसन लाडू, करंजी, चकली, शंकरपाळी, चवडा आदी आठ जिन्नस असणार आहेत.
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या एकता युवक मंडळाने दिवाळीत महागाईत देखील 800 ते 900 रुपयात प्रति किलो 9 प्रकारचे फराळ जिन्नस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सदर पदार्थ तयार करण्यासाठी 1200 ते 1300 रु खर्च असताना देखील सामाजिक बांधिलकी म्हणून एकता युवक मंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे.