Friday, December 27, 2024

/

बेळगाव गांधीनगर येथे ईद मिलाद मिरवणूक करताना तलवार

 belgaum

बेळगाव गांधीनगर येथे ईद मिलाद मिरवणूक करताना तलवार- ईद मिलादमधील मिरवणुकीत तलवार नाचविल्याचा कार्यक्रम बेळगावच्या गांधी नगरात घडला असल्याची चर्चा आहे.

मंगळवारी ईद मिलाद सणाच्या मिरवणुकीवेळी सहभागी झालेल्या तरुणांच्या हातात तलवार होती. त्यांनी आपल्या धर्मगीतावर तलवार नाचवली. असे दर्शविणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामुळे विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

माळ मारुती पोलिसस्थानक हद्दीत ही घटना घडली आहे. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल होत असल्याने त्याचा प्रसार जोरदार होऊ लागला आहे.

या व्हिडिओमुळे काही अनुचित घडण्यापूर्वी पोलिसांनी आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.