संरक्षण मंत्रालयातर्फे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. पदभरतीचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या भरतीअंतर्गत चार्जमन, गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, कनिष्ठ आहारतज्ञ, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ मसुदाकार आणि वैज्ञानिक सहाय्यक या पदांचा समावेश आहे.
प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
संरक्षण मंत्रालयाने भरती प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी कर्मचारी निवड आयोगाकडे (एसएससी) सोपवली आहे. त्याच वेळी, भरती प्रक्रियेअंतर्गत, एसएससीने एकूण ८२७ रिक्त जागांसाठी अर्ज मागिवले आहेत.
चार्जमनच्या १८
गर्ल्स कॅडेट इंस्ट्रक्टरच्या २६७
ऑक्युपेशनल थेरपिस्टच्या ३
कनिष्ठ आहारतज्ज्ञांच्या १
ज्युनिअर इंजिनीअरच्या १६५
सिनिअर ड्राफ्टमनच्या ६
वैज्ञानिक सहाय्यकाच्या ९
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख: २४ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर
अर्जाची अंतिम तारीख: २५ ऑक्टोबर रात्री ११.३० पर्यंत
ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख: २८ ऑक्टोबर रात्री ११.३० पर्यंत
ऑफलाइन चालान तयार करण्याची शेवटची तारीख: २८ ऑक्टोबर रात्री ११.३० पर्यंत
चालानद्वारे पेमेंट करण्याची शेवटची तारीख: १ नोव्हेंबर
कॉम्प्युटर आधारित परीक्षेच्या तारखा: जानेवारी/फेब्रुवारी २०२२
अधिकृत वेबसाईट – www.mod.gov.in