एसकेई सोसायटीच्या टिळकवाडीतील राणी पार्वतीदेवी कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे (आरपीडी) येत्या मंगळवार दि. 2 नोव्हेंबर 2021 रोजी ‘दिवाळी महोत्सव’ या राष्ट्रीय पातळीवरील आकाश कंदील बनवण्याची स्पर्धा तथा विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवाळीचा आकाश कंदील बनवण्याची स्पर्धा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असणार आहे. पदवीपूर्व आणि पदवी विभाग गट -1 आणि खुला हायस्कूल गट -2 अशा दोन गटात ही स्पर्धा घेतली जाईल. दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 3000, 2000 आणि 1000 रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. या खेरीज प्रत्येकी दोन 500 रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील.
दिवाळी महोत्सवा दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आकाश कंदील बनवण्याची स्पर्धा आयोजित केली जाईल. तसेच विक्री प्रदर्शन महाविद्यालयाच्या पी. एल. देशपांडे ओपन थिएटरच्या ठिकाणी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत भरवण्यात येणार आहे.
तरी प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घेऊन प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच विक्री प्रदर्शन व स्पर्धेसंदर्भात डाॅ. एच. बी. कोलकार (मो. क्र. 9481562481), पूजा डी. पाटील (मो. क्र. 8880803575) किंवा परसु डी. गावडे (मो. क्र. 9655697331) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शोभा नाईक यांनी केले आहे.