बेळगावचे पोलीस उपायुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) डॉ. विक्रम आमटे यांनी नुकतीच बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. तसेच वृद्धाश्रमाच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले.
बेळगावचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आपटे यांनी नुकतीच बामणवाडी येथील श्री शांताई वृद्धाश्रमास सदिच्छा भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली.
यावेळी ॲलन मोरे यांनी पोलिस उपायुक्तांची स्वागत केले. वृद्धाश्रमात फेरफटका मारून डॉ. आमटे यांनी तेथे आश्रयास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करण्याद्वारे त्यांची उमेद वाढविली.
तसेच वृद्धाश्रमाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून संचालक मंडळाबद्दल प्रशंसोद्गार काढले. शांताई वृद्धाश्रमाततर्फे सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे आणि संतोष ममदापुर पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आपटे यांचा सत्कार केला.
यावेळी शांताई वृद्धाश्रमाचे अन्य संचालक, कर्मचारी आणि आश्रमातील आजी -आजोबा उपस्थित होते.
किल्ले राजहंस गड प्रतिकृतीचे उद्घाटन उत्साहात
दसरा -दीपावलीनिमित्त पाटील गल्ली, येळ्ळूर येथे पी.जी.स्पोर्ट्स असोसिएशन आणि बालगोपाळांनी साकारलेल्या किल्ले राजहंस गड प्रतिकृतीचा उद्घाटन समारंभ काल गुरुवारी उत्साहात पार पडला.
येळ्ळूर येथील पाटील गल्ली येथे किल्ले राजहंस गड प्रतिकृती उद्घघाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून येथील प्रतिष्ठित नागरिक गल्लीचे आधारस्तंभ विनोद रामचंद्र पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रतिकृतीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन दळवी यानी केले, तर आभार प्रदर्शन मंडळाचे कार्यकर्ते पृथ्वीराज पाटील याने केले.
किल्ले राजहंस गडाची प्रतिकृती साकारण्यासाठी पी.जी.स्पोर्ट्स असोसिएशनचे कार्यकर्ते कार्तिक पाटील,प्रज्वल पाटील, नितीश दळवी, प्रवीण पाटील, स्वप्निल पाटिल, विष्णु पाटिल, अभिषेक पाटिल, शेखर काकती, अवधूत पाटिल, अनिकेत पाटिल आदी कार्यकर्ते आणि पाटिल गल्लीतील बालगोपाळांनी परिश्रम घेतले.