Friday, January 3, 2025

/

दसऱ्यानिमित्त प्राणी बळी नको : श्री दयानंद स्वामी

 belgaum

देवालयांना वधालय न बनवता दिव्यालय बनवा. त्यांना रक्त-मांसाचे आगर बनवू नका. मुक मुग्ध प्राणी -पक्षांनाही जगण्याचा अधिकार आहे. दसऱ्या दिवशी त्यांची हत्या करू नका, असे आवाहन विश्व प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्री दयानंद स्वामीजी यांनी केले.

विश्व प्राणी कल्याण मंडळ, राष्ट्रीय बसवत दल, लिंगायत संघटना आणि जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दयानंद स्वामीजींच्या नेतृत्वाखाली आयोजित अहिंसा प्राणी दया संदेश यात्रेला आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी या संदेश यात्रेला चालना दिली. याप्रसंगी बोलताना श्री दयानंद स्वामीजी यांनी उपरोक्त आवाहन केले.

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आपले विचार व्यक्त करताना सणानिमित्त प्राणी-पक्ष्यांचे बळी दिले जाऊ नयेत, हा स्वामीजींचा संदेश अतिशय योग्य असल्याचे सांगितले. कोणतीही यात्रा व समारंभात तसेच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी प्राणी-पक्ष्यांचे बळी दिले जाऊ नयेत.

खानापूर तालुक्यातील कक्केरी येथे दसऱ्याला होणाऱ्या बिष्टादेवी यात्रेत पशू बळी देण्याची वाईट प्रथा आहे. मात्र यावेळी गुरुवारी यात्रेदिवशी संपूर्ण दिवसभर बिष्ठादेवी मंदिर किंवा कक्केरी गावाच्या हद्दीत पशुबळीस बंदी घालण्याचा आदेश मी बजावला आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

विश्व प्राणी कल्याण मंडळाची अहिंसा प्राणी दया संदेश यात्रा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर, कक्केरी, अळणावर आदी प्रमुख गावांमध्ये काढली जाणार आहे आजच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी विश्व प्राणी कल्याण मंडळ व राष्ट्रीय बसव दलाच्या सदस्यांसह लिंगायत व जैन समाजातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.