Friday, December 27, 2024

/

‘हा’ धोकादायक ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी

 belgaum

रयत गल्ली, वडगाव येथील वरचेवर जळून खराब होणारा विद्युत ट्रान्सफॉर्मर स्थानिकांसाठी धोकादायक ठरत असून हा ट्रान्सफॉर्मर बदलून नवा ट्रान्सफॉर्मर बसवावा अथवा त्याची जागा बदलावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

रयत गल्ली येथे रस्त्याच्या कडेला अनेक वर्षापासून मोठा विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवली आहे. मात्र अलीकडे दुरुस्ती करून सर्व साहित्य नवीन घातल्यापासून त्या ट्रान्सफॉर्मरमधून आगीच्या ठिणग्या खाली पडत आहेत. मोठा स्फोटाचा आवाज येऊन वीज पुरवठा खंडित होत आहे. गेल्या शनिवारी दुपारीतर स्टेनगनमधून गोळीबार व्हावा तसा आवाज येऊन ठिणग्या उडण्यास सुरुवात झाल्या. परिणामी रस्त्यावर एकच धावपळ उडाली. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना जीव मुठीत धरून जावे लागत होते.

ठिणग्या उडण्या बरोबरच ट्रान्सफॉर्मर खालील पेटीत आग लागून आतील सर्व वायरिंग जळत होते. खांब्यावरील मोठ्या वायरवरील पेटलेले आवरण आणि पेटीतून जळणाऱ्या वायरीचा मोठा धूर येत होता. खांबाजवळ गेल्यास सर्व तापले असल्याने धग जाणवत होती. या घटनेची माहिती लागलीच शहापूर हेस्कॉम कार्यालयाला देण्यात आली. त्यानंतर हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी येऊन सर्व साहित्य जळलेल पाहून दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाईल असे सांगितले.

दरम्यान, सदर विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत असा प्रकार वारंवार घडत असल्यामुळे जनतेच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेंव्हा हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ट्रान्सफॉर्मरची प्रत्यक्ष पहाणी करुन तो बदलावा आणि जनतेतील घबराट दुर करावी, अन्यथा असेच चालू राहिल्यास आणि कांही वाईटबरे झाल्यास त्याला हेस्कॉमच जबाबदार राहिल, असा इशारा रयत गल्लीतील नागरिकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.