खानापूर तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कोरोना लशीबाबत आढावा घेतला तसेच तालुक्यातील लोकांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यात यावा अशी मागणी केली यावेळी आरोग्य खात्यातर्फे तालुक्यातील एक लाख 62 हजार लोकांना पहिला तर 75312 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच येत्या काही दिवसात कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण केले जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
कोरोना लस देण्यास सुरुवात झाल्यापासूनच युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने तालुका आरोग्य अधिकारी संजीव नांद्रे यांची भेट घेऊन तालुक्यातील लोकांना लस उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी केली होती सुरुवातीला खानापूर तालुक्यात लसीकरणाचा वेग कमी होता मात्र युवा समितीने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर नागरिकांना लस उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची सातत्याने पाठपुरावा करण्यात आला त्यामुळे तालुक्यातील इतर तालुक्याबरोबरच खानापूर तालुक्यामध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे.
खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव सदानंद पाटील, ज्ञानेश्वर सनदी, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, आनंद झुंजवाडकर, राजू पाटील, संकल्प शिंदे आदीनी आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
खानापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्या तरी या केंद्रांमध्ये रुग्णसेविका उपलब्ध नाही त्यामुळे अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने तातडीने हलसी ते खानापूर, लोंढा ते खानापूर, कणकुंबी ते खानापूर व इतर मार्गांवर रुग्ण सेविका उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही युवा समितीतर्फे करण्यात आली आहे. तसेच रुग्ण वाहिका उपलब्ध करून देण्यास अडचण असेल तर माहिती द्यावी ज्याप्रमाणे उपायोजना करण्यासाठी युवा समितीतर्फे पावले उचलली जातील अशी माहिती आरोग्य अधिकार्यांना देण्यात आली आहे.