असंघटित बांधकाम कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करण्यात आल्या मात्र त्या प्रत्यक्षात आल्याच नाहीत .या योजना फक्त कागदावरच राहिल्या असून बांधकाम कामगारांवरील अन्याय सुरूच आहेत.
या विरोधात उद्या भव्य मोर्चा काढून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे. बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने उद्या शुक्रवारी भव्य अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
बांधकाम कामगारांना कामगार कल्याण मंडळ स्थापन करून प्रत्येकी 5 लाख रुपये घर बांधण्यासाठी व जागा खरेदी करण्यासाठी कर्ज स्वरूपात देतो असे आश्वासन देण्यात आले होते. त्या मध्ये 50 टक्के सबसिडीचे गाजरही दाखवण्यात आले होते. मात्र आता दहा वर्षांमध्ये एक सुद्धा कामगाराला हे कर्ज मिळालेले नाही.
अनेक कामगारांना स्कॉलरशिप आणि लग्नाचे पैसे लवकर मिळायला तयार नाहीत. त्यासाठी उद्या तारीख 22 ऑक्टोबर 2021 सकाळी 10.30 वाजता चन्नम्मा सर्कल पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व कामगार वर्गाने ह्या मोर्चामध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती एन आर लातूर वकील यांनी केली आहे.