बेळगाव शहराला पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने आज आमदार अनिल बेनके व खासदार मंगल अंगडी यांनी महानगरपालिकेच्या स्कॉलर्स हॉलमध्ये एक विशेष बैठक घेतली.
एल अँड टी, कर्नाटक पाणी पुरवठा मंडळ आणि हेस्कोम अधिकाऱ्यांना तेवढे कडक सूचना देण्यात आली आहे.
ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही स्वतः दूर करून घ्याव्या. त्याचा जनतेला त्रास झाला तर आम्ही कारवाई करणार आहे.
आवश्यक ती कारवाई करण्यापेक्षा आमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग शिल्लक राहणार नाही. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा. असा इशारा आमदार अनिल बेनके यांनी खासदार मंगल अंगडी यांनी दिला आहे .
यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त रुद्रेश घाळी यांच्यासमवेत संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली आहे.