Thursday, April 25, 2024

/

कालव्यात बुडून बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यू

 belgaum

खेळायला गेलेल्या बहीण-भावांचा पाय घसरून कालव्यात पडल्याने बुडवून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कोहळ्ळी (ता. अथणी) येथे घडली.

विजय विनायक पुंडीपल्ले (वय 7 वर्षे) आणि सुषमा विनायक पुंडीपल्ले (वय 11 वर्षे) अशी मृत मुलांची नावे आहेत. हे दोघे श्रीधर शंकर पुंडीपल्ले (वय 3 वर्षे) आणि विश्वनाथ विनायक पुंडीपल्ले (वय 8 वर्षे) या आपल्या अन्य दोन भावंडांसमवेत खेळण्यासाठी गेले असता कालव्यात बुडाले. त्यावेळी श्रीधर आणि विश्वनाथ यांना कालव्याबाहेर काढण्यात आले. मात्र विजय आणि सुषमा यांचा दुर्दैवाने पाण्यात बुडून मृत्यू झाला. अग्निशामक दलाच्या जवानांच्या सहाय्याने श्रीधर व विश्वनाथ यांना कालव्यातून बाहेर काढेपर्यंत त्या दोघांचा पाण्यात पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेमुळे पुंडीपल्ले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कोहळ्ळी ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेची ऐगळी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.