राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सर्व नागरिकांनी मतदार यादीत नांव नोंदणी व दुरुस्तीसाठी ‘होटर्स हेल्पलाइन ॲप’ डाऊनलोड करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.
प्रत्येक नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मतदारांच्या अनुकूलतेसाठी होटर्स हेल्पलाइन ॲप गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.
या ॲपच्या माध्यमातून नांव नोंदणी, दुरुस्ती व नांवे इतर ठिकाणच्या यादीत समाविष्ट करणे, नांव कमी करणे आदी बाबी करता येणार आहेत.
राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांनी या संबंधी सूचना केल्याचेही जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. गेल्या 1 जानेवारी 2021 पासून सचित्र मतदार याद्याही या ॲपवर उपलब्ध आहेत. मात्र ही यादी पाहण्यासाठी होटर्स हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे.