Thursday, January 2, 2025

/

विद्याआधार तर्फे 52 जणांना विद्याधन वितरण

 belgaum

शांताई वृद्धाश्रम संचलीत विद्याआधार रद्दीतून बुध्दिकडे उपक्रमातील या वर्षीच्या 52 लाभार्थींना विद्याधन वितरणाचा कार्यक्रम झाला. भाऊराव काकततर कॉलेजच्या सभागृहामध्ये गुरुवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्रा व्ही एल पाटील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाऊराव काकतकर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस एन पाटील , विद्या आधार चे अध्यक्ष विनायक लोकूर ,सेक्रेटरी विजय मोरे आणि संयुक्त सचिव संतोष ममदापूर आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

प्रारंभी संतोष ममदापूर यांनी स्वागत केले. विनायक लोकूर यांनी विद्या आधारच्या स्थापनेचा उद्देश विशद केला. पैसे नाहीत आणि आधार नाही यामुळे अनेकांचे शिक्षण अडले जाऊ नये यासाठी विद्या आधारची स्थापना करण्यात आली असून आजवर 400 हुन अधिक विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही माहिती त्यांनी दिली.

Vidhya aadhar
यानंतर माजी महापौर विजय मोरे यांनी विद्या आधारच्या माध्यमातून बेळगावतच नव्हे तर कोल्हापूर सारख्या ठिकाणीही अनेक विद्यार्थ्यांना कशी मदत मिळवून दिली याची माहिती दिली.

यानंतर विद्याधन वितरित करण्यात आले.प्राचार्य डॉ एस एन पाटील यांनी विद्याआधार व भाऊराव काकतकर कॉलेज यांच्या माध्यमातून समन्वय करार करून विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रस्ताव यावेळी बोलून दाखविला. प्रा. व्ही एल पाटील यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. एलन मोरे यांनी आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.